
तुम्ही मद्यपान करुन वाहन चालवू नये याची खात्री कशी करावी?
तुम्हाला काही होऊ नये म्हणून तुम्ही मद्यपान करुन वाहन चालवू नये. तुम्ही विवेकशील असू शकता, परंतु तुमच्या दिशेने येणारा ड्रायव्हर नशेत धुंद असू शकतो. अशा वेळेस तुमचा व इतरांचा जीव वाचविण्यासाठी तुम्ही काय करु शकता ते येथे दिलेले आहेः
- जेवण करुन गाडी चालवा, हसून गाडी चालवा, बोला आणि गाडी चालवा मात्र काहीही झाले तरीही मद्यपान करुन वाहन चालवू नका.
- मद्यपान केलेल्या व्यक्तिबरोबर कधीही प्रवास करु नका.
- तुम्ही एखाद्या सामुहिक मद्यपान केले असल्यास नेहमी टॅक्सी किंवा ड्रायव्हर ला बोलवा.
- तुमचे मित्र किंवा सहकारी यांना मद्यपान करुन वाहन चालवू देऊ नका.
- तुम्ही एखाद्या ठिकाणी समूहाने जात असल्यास, एका व्यक्तिला मद्यापासून दूर रहाण्यास सांगा व त्या व्यक्तिला गाडी चालवण्याचे काम द्या.
- पार्टीला जाताना, एखाद्या व्यक्तिस (जो विवेकशील असेल) तुम्हाला परत घरी आणण्याचे काम द्या.
- जबाबदारीने वागा – जेव्हा तुम्ही लोकांना आमंत्रित करता, तेव्हा प्रत्येकाने सुरक्षितपणे घरी परत गेले पाहिजे याची काळजी घ्या.
- रात्री बाहेर जाण्यासाठी प्रत्येक वेळेस बार किंवा पब चा विचार करु नका- रेस्टॉरंट मध्ये टेबल बुक करा, महामार्गावरील धाब्यावर जा किंवा तुमच्या शहरात नव्याने आलेल्या फूड ट्रक चा विचार करा.