अल्पवयात मद्यपान करणे

21 या कायद्याने मद्यपान करण्याच्या वयापेक्षा कमी वयात मद्य(अल्कोहोल) घेतल्यास त्याला अल्पवयात मद्यपान करणे असे म्हणतात. अल्पवयात मद्यपान करणे हा एक धोका आहे जो पौगंडावस्थेतील व किशोरवयीन मुलांना

पौगंडावस्थेतील मुले मद्यपान का करतात?

गुणात्मक संशोधनावरुन असे दिसून आले आहे की अल्पवयात मद्यपान करण्यास अनेक कारणे असतात आणि सामाजिक दृष्ट्या मद्य अनेक भूमिका पार पाडत असते, प्रतीकात्मक पासून व्यावहारीक; हे केवळ मोठे होण्याचे लक्षण किंवा मोठ्यांचे अनुकरण करणे नसते.
मुले मद्यपान कशामुळे करु शकतात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे जेणे करुन ते त्यांच्या मुलांना योग्य निवड करण्यास प्रवृत्त करु शकतात.

मुलांचा मद्यपान करण्याचा पहिला अनुभव जरी चांगला नसला तरीही ती याकडे खेचली जाऊ शकतात. कदाचित त्यांना चव आवडली नसेल किंवा त्यांना त्यानंतर चांगलेही वाटले नसेल तरी देखील ते पुन्हा मद्यपान करतात. अल्पवयात मद्यपान करण्याचे धोके त्यांना समजणे गरजेचे आहे परंतु जोपर्यंत तुम्ही मद्याचा योग्य पैलू व लोक मद्य का घेतात हे त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते तुमचे ऐकणार नाहीत व तुमच्यावर विश्वासही ठेवणार नाही.

धोका पत्करणे -संशोधनाने हे दाखवून दिलं आहे की विसाव्या वर्षी मेंदूचा चांगला विकास होतो, या वयामध्ये मुले नवीन संपर्क जोडतात व पुढे जाऊन त्यामध्ये आणखी सुधारणा करतात. वैज्ञानिकांचा विश्वास आहे की या विकासाच्या दिर्घ अवधीमध्ये मुलांच्या वर्तणुकीत असे बदल घडतात ज्यामुळे आपण त्यास पौगंडावस्था म्हणू शकतो – जसे नवीन व धोकादायक असलेल्या गोष्टींकडे त्यांचा कल असणे, काही किशोरवयीन मुलांना चित्तथरारक गोष्ट म्हणून मद्यपान करण्यात रुची असते. विकासात्मक बदलांमुळे शारीरिक बदल घडून येतात ज्यामुळे किशोरवयीन मुलांचे वागणे आवेगपूर्ण असते, काही वेळा मद्यपान करण्यासारख्या त्यांच्या कृतीमुळे –काही परिणाम होतात हे सुद्धा त्यांना कळत नाही.

Please select the social network you want to share this page with: