अती मद्यपान टाळण्यासाठी मी काय करू शकतो?
Posted by Responsible Consumption / in अति मद्यपान /
अती मद्यपान टाळण्यासाठीचे वैयक्तीक टप्पे पुढीलप्रमाणे असू शकतातः
- अती मद्यपानाच्या दुरगामी परिणामापासुन सावध राहाः अती मद्यपानावर मात करण्याचा स्पष्ट निर्णय घेण्यासाठी अती मद्यपानाशी जोडलेल्या समस्यांबाबत जागरूक असणे महत्वाचे आहे.
- अती मद्यपानाच्या परिस्थीती आणि संभाव्य दुष्परिणाम टाळाः ज्याठिकाणच्या पार्टी किंवा समारंभामध्ये मद्यपान हा सर्वात महत्वाचा भाग असतो तेथे जाणे टाळा. मद्यपान स्पर्धा किंवा खेळ टाळा.
- प्रमाणीत मद्यपान म्हणजे काय हे समजून घ्याः सुचविलेल्या किंवा प्रमाणीत आकारापेक्षा मोठ्या आकारात मद्य दिले जाते का याबद्दल जागरूक बना.
- हळुवार ग्रहण करा. एकावेळी मद्याचे थोडेसेच घोट घ्या. एका तासात जास्त ड्रिंक घेऊ नका. तुमचे शरीर तुमच्या शेवटच्या घोटानंतर 90 मिनीटानंतर मद्य शोषू शकते, आणि त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याची तुम्हाला जाणीव सुद्धा नसते.
- सोडा किंवा इतर अ-मद्य पेय यांची निवड करा.
- मनात मद्य सारख्या प्रमाणात ग्रहण करण्याची मर्यादा असलेल्या मित्रांसोबतच बाहेर जा. मित्र एकमेकांना पिण्यासाठी आग्रह करतात. त्यामुळे तुमच्या मर्यादेचा आदर करणाऱ्या आणि अती मद्यपान न करणाऱ्या मित्रांसोबतच बाहेर जा.
- अल्कोपोप्स पासुन लांब राहा. अल्कोपोप्स मध्ये भरपुर साखर असते ज्यामुळे त्याची चव नेहमीच्या सोडा पेयांप्रमाणेच असते. हे कमी वेळेत फार जास्त प्रमाणात पिण्यासाठी सोपे असते.
- लक्षात घ्या की, मद्य हे शौकीन पेय म्हणुन सामाजीकदृष्ट्या माफ आहे, परंतु ती स्पर्धा नाही, आणि तो कुल दिसण्याचा पर्याय सुद्धा नाही.
अती मद्यपान करण्याचे परिणाम समजुन घेऊन त्याबद्दल जागरूकता पसरविल्याने समाज निरोगी व उत्तम वागणुक साधण्यास सक्षम बनेल. पालक आणि प्रौढांनी मुले व त्यांच्या समाजासोबत अती मद्यपानाच्या वाईट परिणामांबद्दल चर्चा करायला हवी.