
20
Aug 2015पुरूष आणि महिला यांमध्ये फरक का आहे?
Posted by Responsible Consumption / in जबाबदार मद्यपान / No comments yet
मद्याचा महिलांवर पुरूषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने परिणाम होतो. याची काही कारणे आहेत.
- सरासरी, महिलांचे वजन कमी असते आणि वजन कमी असलेल्या लोकांच्या रक्तामध्ये जास्त वजन असलेल्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोल पोहोचतो.
- महिलांमध्ये ऍडीपॉज ऊती (मेद) जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे हळुवारपणे मद्य शोषल्या जातात आणि त्याचा परिणाम जास्त काळ टिकतो.
- महिलांच्या शरीरात मद्य द्रवीकृत होण्यासाठी पाण्याचे प्रमाण कमी असते. महिला व पुरूषांनी सारख्याच प्रमाणात मद्य पिल्यास, महिलांच्या रक्तामधील मद्याचे प्रमाण जास्त असते.
- महिलांमध्ये एन्झाईमचे प्रमाण कमी असते ज्यामुळे मद्याचे विलगीकरण होते. एन्झाईमचे प्रमाण कमी असल्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये मद्य जास्त काळ तसेच राहाते.